रजनीकांत घेणार सिंगापूरमध्ये उपचार

May 27, 2011 5:01 PM0 commentsViews: 5

27 मे

सुपरस्टार रजनीकांतला आता पुढील उपचारांसाठी सिंगापूरला नेलं जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ते हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांना डायलेसीसवर ठेवण्यात आलंय. पण त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नाही. त्यामुळे आता त्यांना सिंगापूरमधील नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जाणार आहे. पण त्यांची प्रकृती स्थिर असल्याचा दावा त्यांच्या पत्नीनं केला. रजनीकांतला एकांताची गरज असल्याने त्यांना सिंगापूरला नेण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

close