जनमताच्या रेट्यापुढे झुकलं सरकार ; मेधा पाटकरांचे उपोषण मागे

May 28, 2011 9:29 AM0 commentsViews: 6

28 मे

मुंबईतील सांताक्रूझ येथील गोळीबार रोडवरच्या आंदोलकांसाठी गेले 9 दिवस सुरू असलेलं मेधा पाटकर यांचं आंदोलन पूर्णपणे यशस्वी झालं आहे. त्यांच्या पाचही प्रमुख मागण्या सरकारला मान्य कराव्या लागल्या. जनमताच्या रेट्यापुढे राज्य सरकार पुन्हा एकदा झुकलंय.

मुंबईतल्या झोपडपट्टीचा विकास कसा करावा याबद्दल राज्य सरकारने आंदोलकांपैकी चार जणांना एकत्र घेऊन कमिटी नेण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवाय खार येथील गोळीबार रोडवरच्या गणेशकृपा सोसायटीसंदर्भात न्या. सुरेश बोस्टे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याचाही निर्णय घेण्यात आला.

येत्या 15 दिवसांत यासंदर्भात चौकशी होणार आहे. तोपर्यंत या ठिकाणी बांधकाम पाडली जाणार नाहीत, हे सुद्धा सरकारला मान्य करावे लागले आहे. याबद्दल मेधा पाटकरांचे कार्यकर्ते सिम्प्रित सिंग यांनी सरकारसोबत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती दिली.

close