हायकमांडची अव’कृपा'; उचलबांगडी करण्याचा निर्णय

May 28, 2011 9:38 AM0 commentsViews: 1

28 मे

कृपाशंकर सिंग यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन उचलबांगडी करण्याचा निर्णय हायकमांडने घेतला आहे. झारखंडमधील मधु कोडा प्रकरणात कृपाशंकर सिंग यांचं नाव आल्याने त्यांच्यावर कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कृपाशंकर सिंग यांच्याऐवजी नवीन अध्यक्षांची चाचपणीही काँग्रेसने सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून आयबीएन लोकमतला मिळाली आहे.

कृपाशंकर सिंग यांच्यानंतर आता मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी तीन नावांची चर्चा सुरू आहे.- खासदार प्रिया दत्त- केंद्रीय मंत्री गुरूदास कामत – आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी

close