पुण्यात शिवशक्ती-भीमशक्ती मेळाव्याला मुंडे गैरहजर

May 28, 2011 10:01 AM0 commentsViews: 9

28 मे

शिवशक्ती-भीमशक्तीच्या एकत्रीकरणासाठी आता युती आणि आरपीआयनं प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यभरात मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. पण या नवीन युतीला पुण्यात मात्र धक्का बसला.

भाजपच्या पुणे शहर अध्यक्षपदावरुन चाललेल्या वादामुळे नाराज झालेल्या गोपीनाथ मुंडेंनी या मेळाव्याला दांडी मारली. भाजपच्या शहरअध्यक्षपदी गडकरी गटाचे विकास मठकरी यांची नियुक्ती करण्यात आल्याने नाराज झालेल्या मुंडेंनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान शिवशक्ती-भीमशक्तीचे संयुक्त मेळावा आज पुण्यात पार पडला. या मेळाव्याच्या पीचवर रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी कसलेल्या बॅट्समनप्रमाणे जोरदार फटकेबाजी केली. येणार्‍या काळात आमची टीम आघाडीच्या टीमला नक्की हरवेल असा विश्वासही व्यक्त केला.

दरम्यान, भाजप नेते विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन सारवासारव करत मुंडे दुसर्‍या कार्यक्रमात असल्याने येऊ शकले नाहीत असं सांगितलं.

close