संजय दत्त विरोधात अजामीनपात्र वॉरंट

May 28, 2011 10:49 AM0 commentsViews: 6

28 मे

अभिनेता संजय दत्त याच्याविरोधात उत्तर प्रदेशातल्या कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट बजावलं आहे. 2009 मधल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चिथावणीखोर भाषण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

आपली आई मुस्लीम असल्यानंच आपल्याला टाडाखाली अटक करण्यात आली होती असं संजय दत्तनं म्हटलं होतं. यामुळेच आपला तुरुंगात छळ झाल्याचा जाहीर आरोपही त्याने केला होता.

समाजवादी पक्षाच्या स्थानिक उमेदवाराच्या प्रचारावेळी त्यानं हे वक्तव्य केलं होतं. स्थानिक प्रशासनाने त्याचं हे भाषण रेकॉर्ड केलं होतं. त्याच्या आधारे संजय दत्तविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

close