ठाण्यात चौदा वर्षीय मुलीची हत्या

May 28, 2011 2:04 PM0 commentsViews: 3

28 मे

ठाण्याच्या चिरागनगर येथे एका चौदा वर्षाच्या मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. या मुलीची आई वसंत विहारमधल्या पंचवटी सोसायटीत घरकाम करते. तिच्या गैरहजेरीत तिची मुलगी विक्रम जसरा या व्यक्तीच्या घरी घरकाम करण्यासाठी गेली.

पण नंतर काही लोकांनी तिला घराबाहेर मृतावस्थेत पाहिलं. आणि तिला ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मुलीच्या नातेवाईकांनी जसरा याच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.

close