अ.भा.नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी हेमंत टकले

May 28, 2011 2:57 PM0 commentsViews: 48

28 मे

अखिल भारतीय नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी हेमंत टकले यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी विनय आपटे यांची निवड करण्यात आली आहे. नाटयपरिषदेच्या नियामक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली.

यानंतर अध्यक्षपदासाठी हेमंत टकले यांची तर उपाध्यक्षासाठी विनय आपटे यांची बिनविरोध निवड झाली. हेमंत टकले यापूर्वी नाट्यपरिषदेचे उपाध्यक्ष होते.

हेमंत टकले गेली 25 ते तीस वर्ष मराठी रंगभूमीवर सक्रीय आहेत. नाशिकमधल्या लोकहितवादी मंडळ या संस्थेतनं ते काम करतात. ही संस्था नाशिकमध्ये राज्य स्तरीय स्पर्धा आयोजित करते.

याशिवाय हेमंत टकले यांचा राजकीय क्षेत्रातही सहभाग आहे. राष्ट्रवादीचे ते आमदार आहेत. नाट्यस्पर्धा, प्रायोगिक रंगभूमीचे कार्यक्रम अशा सर्वस्तरांवर त्यांचा पुढाकार असतो. याबरोबरच एकच प्याला या संगीत नाटकाचे डॉ.श्रीराम लागूंनी गद्य नाटकात रुपांतर केलं होतं, आणि या गद्यनाटकामध्ये टकले यांनी भूमिका साकारली होती.

close