ऑनलाईन बदल्यांमध्ये पारदर्शकता नसल्याचा शिक्षकांचा आरोप

May 28, 2011 11:29 AM0 commentsViews:

28 मे

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ऑनलाईन बदल्यांमध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. जिल्ह्यातील शाळांमधील सर्व रिक्त जागा न दाखवणे, मुद्दाम गैरसोयीच्या जागी बदली करणे, पती पत्नी दोघंही शिक्षक असतील तर शासनाच्या नियमानुसार 30 किलोमीटर अंतराच्या आत असलेल्या शाळांमधे नियुक्ती न करणं असे अनेक आरोप नाराज शिक्षक – शिक्षिकांनी केलेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतींनी मात्र शासन निर्णयानुसार पारदर्शकपणे बदल्या होत असल्याचा दावा करत काही ठराविक शिक्षक याला स्वार्थापोटी विरोध करत असल्याचं म्हटलंय.

close