एकतर्फी प्रेमातून तरूणीवर चाकूने हल्ला

May 28, 2011 3:20 PM0 commentsViews: 1

28 मे

सातारा जिल्ह्यातील उडतारे गावात एकतर्फी प्रेमातून एका युवकाने तरूणीवर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. विनायक मिरजकर असं या तरूणाचं नाव आहे. या हल्ल्यात तरूणी गंभीर जखमी झाली असून तिला सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आलंय.

याप्रकरणी पोलिसांनी विनायकला अटक केली आहे. तरूणीवर चाकूने वार करून पळून जाण्याचा प्रयत्न करणार्‍या विनायकला गावकर्‍यांनी पकडून बेदम चोप दिला त्यात तो जखमी झाला. तो जखमी झाल्यामुळे त्यालाही सामान्य रूग्णालयात दाखल केलं आहे.

close