सलमानच्या जमिनी विरोधात गावकरी आंदोलनास ‘रेडी’

May 28, 2011 1:14 PM0 commentsViews: 9

28 मे

अभिनेता सलमान खान याची पनवेलजवळची वाजे गावातील जमीन वादाच्या भोवर्‍यात अडकली आहे. सलमान खाननं 2003 साली गावकीच्या मालकीची असलेली अडीच एकर जमीन विकत घेतली होती.

वाजे गावातल्या 6 पंचांनी अडीच एकराचा भूखंड ग्रामसभेच्या परवानगीशिवाय थेट सलमानला विकल्यामुळे या व्यवहाराची गावकर्‍यांना कोणताही माहिती नव्हती. ही जमीन सलमान खानने बेकायदेशीरपणे विकत घेतल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. ही जागा परत मिळावी यासाठी गावकर्‍यांनी आंदोलन सुरू केलं आहे.

close