खतविक्रेत्यांची नावं वर्तमानपत्रात जाहीर करणार – कृषीमंत्री

May 28, 2011 3:46 PM0 commentsViews: 2

28 मे

शेतकर्‍यांची फसवणूक टाळण्यासाठी खत आणि बियाणांच्या किंमती तसेच खतविक्रेत्यांची नावं वर्तमानपत्रात जाहीर करणार असल्याचे कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितलं आहे. ते चंद्रपूरमध्ये बोलत होते.

मान्सूनची चाहुल लागली आहे आणि येत्या 10 ते 15 दिवसातच मृग बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची खरिपाच्या हंगामासाठी लगबग सुरु झाली आहे.

पेरण्यांसाठी विश्वासाचे बियाणं आणि खात्रीची खतं मिळवण्यासाठी शेतकर्‍यांची चांगलीच दमछाक होते. आणि गेल्या काही वर्षांपासून तर यात फसवणुकीचेही प्रकार वाढत चालले आहे. बोगस बियाणांमुळे बळीराजाला दुबार – तिबार पेरण्या कर

close