रेड्डी बंधूच्या मंत्रिपदावरून भाजप नेत्यांमध्येच रंगला वाद

May 28, 2011 1:23 PM0 commentsViews: 3

28 मे

कर्नाटकमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मंत्री रेड्डी बंधू यांना मंत्रीपद देण्यामागे अरूण जेटली आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा असल्याचा आरोप सुषमा स्वराज यांनी केला आहे. आऊटलूक या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सुषमा स्वराज यांनी हा आरोप केला आहे.

यापूर्वी या रेड्डी बंधूंच्या पाठीमागे स्वराज असल्याचा बोललं जात होतं. मात्र स्वराज यांनी हा आरोप फेटाळत जेटली यांचेच नाव घेतलं आहे. बेल्लारीच्या या रेड्डी बंधूंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत.

पण अरूण जेटली हेच कर्नाटकचे भाजपचे प्रभारी होते. त्यामुळे रेड्डी बंधूंना कर्नाटकच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यामागे त्यांनाच जबाबादार धरावे लागेल असं स्वराज यांनी म्हटलं आहे.

माझ्याबद्दल जाणीवपूर्वक गैरसमज पसरवल्याचंही स्वराज यांनी म्हटलंय. येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा नवा चेहरा कोण असेल याबद्दल स्वराज आणि जेटली यांच्यात स्पर्धा आहे.त्यामुळेच या दोघांमधले वाद आता चव्हाट्यावर येऊ लागले आहे.

close