इंधन दरवाढीचे पंतप्रधानांनी दिले संकेत

May 28, 2011 4:30 PM0 commentsViews: 2

28 मे

तेलाच्या किंमती आणखी वाढण्याचे संकेत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिले आहे. तेलाच्या वाढत्या सबसिडीचा मोठा ताण सरकावर पडतो. त्यावर नियंत्रण ठेवायला हवं, असं पंतप्रधान म्हणाले.

आफ्रिकेच्या दौर्‍यावरून परतत असताना ते पत्रकारांशी बोलत होते. पाकिस्तानातल्या दहतवादाच्या मुद्द्यावरही त्यांनी मत व्यक्त केलं. पाकिस्तान हा दहशतवादाचा केंद्रबिंदू बनला असल्याचं ते म्हणाले. पाकिस्ताननं दहशतवादाला थारा देणं बंद करावे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारल्यानंतर त्यांनी भारतात पोहचल्यावर त्यावर निर्णय घेतला जाईल असं सांगितलं.

close