काँग्रेसमध्ये जाण्याची कोणतीच इच्छा नव्हती – स्मिता ठाकरे

May 28, 2011 4:59 PM0 commentsViews: 26

28 मे

जातीपातीच्या राजकारणावर आधारित प्रादेशिक राजकारणात काम करण्यापेक्षा राष्ट्रीय मुद्यावर राजकारणात काम करण्याची इच्छा असल्याचं मत चित्रपट निर्मात्या स्मिता ठाकरे यांनी व्यक्त केलंय.

नागपुरात महिलांसाठी सामाजिक कार्य सुरू करण्यासाठी तसेच भाजपाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्या आल्या होत्या. त्यांच्यासोबत संगीतकार इस्माईल दरबारही होते. तसेच पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याची कोणतीच इच्छा नव्हती असं स्पष्ट केलं.

close