पोलिसांचा पर्दाफाश करणार्‍या जिगरबाज दीपकला मारहाण

May 29, 2011 10:38 AM0 commentsViews: 3

29 मे

हप्तेबाज आणि भ्रष्ट पोलिसांचं व्हिडिओ शूटिंग करणार्‍या गोव्यातील एका तरुणाला पोलिसांनी बेदम मारहाण केली. दीपक गाडेकर असं या तरुणाचे नाव आहे. गेल्या जानेवारीपासून भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न दीपक करतोय.

त्यासाठी म्हापसा बस स्टँड आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या अनेक संशयास्पद घडामोडींचं त्यानं शूटिंग केलं. विशेषत: हफ्ते घेणार्‍या पोलिसांचे शूटिंग दीपकनं करुन ठेवले आहे. असाच कालही तो एका ट्रफिक हवालदाराचे शूट करत असताना त्या हवालदाराने दीपकला पकडून बेदम मारहाण केली.

close