आमचूर उद्योगाची यंदाची उलाढाल 2 कोटींच्या घरात

May 29, 2011 10:46 AM0 commentsViews: 2

29 मे

सातपुड्याच्या पर्वतरांगांमधल्या आदिवासी पाड्यांमध्ये सध्या आमचूराचा उद्योग भरभराटील आला आहे. कैर्‍यांपासून आमचूर तयार करण्याच्या या उद्योगात यंदा दीड ते 2 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.

सातपुड्यातल्या आंब्याच्या कैर्‍या येथील आदिवासी गोळा करतात. आणि त्याचे तुकडे करून घरासमोर वाळवतात. आमचूराच्या खरेदीसाठी मोलगीत खास बाजार भरतो.

तिथं हे आमचूर 130 रुपये किलो या दराने आदिवासींकडून व्यापारी खरेदी करतात. पुढं त्याची पावडर तयार केली जाते. स्वयंपाकात स्वाद वाढवणार्‍या या आमचूर पावडरला गुजरात, राजस्थान, दिल्लीपर्यंत मागणी आहे.

close