कला क्षेत्रातील दरी सांधणारी अनोखी जोडी

November 11, 2008 1:50 PM0 commentsViews: 5

11 नोव्हेंबर, मुंबईशिल्पा गाड कलेचं क्षेत्र हे वेगवेगळ्या प्रयोगांसाठी नेहमीच खुलं असतं. मराठी अमराठीतली ही दरी सांधण्याचे प्रयत्न या क्षेत्राकडुनही होत आहेत. राजेश आणि नेहा हे त्याचं उत्तम उदाहरण. दोघंही आटिर्स्ट. दिसताक्षणी हे जोडपं महाराष्ट्रीय वाटेल. पण प्रत्यक्षात राजेश तेलगू तर नेहा महाराष्ट्रीय आहे. 'मी तेलगू आहे पण मी महाराष्ट्रातच जन्मलो आणि मला तेलगू फारसं येत नाही. मी मराठीतच बोलतो ', असं राजेश पुल्लरवार सांगत होते. राजेश हा तेलगू असल्याचं सुरुवातीला नेहाला माहीत नव्हतं. ' माझ्या लग्नाच्या वेळेला मला जेव्हा वडिलांना सांगायचं होतं, तेव्हा मी राजेशला विचारलं की, त्याची जात काय आहे. तोपर्यंत मला माहीतच नव्हतं, की त्याची जात काय आहे ते ', असं नेहानं सांगितलं. भाषा हे उपजिविकेचं साधन असावं, मग ते कुठलं का असेना. कलाकार म्हटलं की, स्वत:चं असं स्वतंत्र अस्तित्व आलंच. त्यात भाषेचा फरक पडतो का ? या प्रश्नाला उत्तर देताना नेहा म्हणाली की, मला नाही वाटत, काही फरक पडतो. कारण माझं लैंग्वेज मिडियम माती तर राजेशचं पेंटिग आहे. त्यामुळे भाषेचा मुद्दा आमच्यात येतच नाही '. शेवटी भाषा कुठचीही असो गरज असते ती एकमेकांना ओळखण्याची.

close