मुंबईच्या काही भागात 25 टक्के पाणी कपात

May 29, 2011 10:57 AM0 commentsViews: 2

29 मे

अप्पर वैतरणातून मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या पाईपलाईनला सहारा व्हिलेजजवळ मोठी गळती लागली आहे. पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम महापालिकेनं हाती घेतलं आहे.

त्यामुळे कुलाबा, चर्चगेट, ऑपेरा हाऊस, नळबाजार, वरळी व्हिलेज, दादर, परळ, वर्सोवा, खारदांडा, वांद्रे, चकाला आणि बोरिवली या भागात 25 टक्के पाणी कपात असेल. ही कपात आज आणि उद्या असेल. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेनं केलं आहे.

close