पुण्याची मुळा- मुठा नदी गटारगंगा होण्याच्या मार्गावर

May 29, 2011 11:06 AM0 commentsViews: 183

29 मे

पुण्याच्या मुळा-मुठा नदीपात्रातील भूमिगत ड्रेनेजलाईन प्रकल्पासमोरच्या अडचणी काही थांबायला तयार नाही. एकीकडे नदीपात्रातील कामं थांबवावीत असा न्यायालयाने आदेश दिलाय आणि दुसरीकडे पर्यावरणवादी कार्यकर्त्या वंदना चव्हाण यांनी केलेला विरोध यामुळे मुळा-मुठाची स्वच्छता मोहीम थांबली आहे.

पुण्याच्या मध्यवर्ती भागातून वाहणार्‍या मुळा- मुठा नदीचं रुपांतर गटारात होत असल्याबद्दल केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी खंत व्यक्त केली होती.

त्यानंतर महापालिकेला जाग आली आणि नदीत सोडण्यात येणारे सांडपाणी ड्रेनेजलाईनमधून बाहेर सोडण्याचा प्रकल्प आखला. पण कोर्टाच्या आदेशानंतर गेले महिनाभर प्रकल्पाचे काम थांबलं आहे. शिवाय या कामाकरता काढला जाणारा राडारोडा पात्रातच टाकला जात असल्यानंही त्यावर आक्षेप घेतले जात आहे.

महापौरांनी मात्र राडारोडा नदीपात्रात टाकला जाणार नाही याची दक्षता घेण्यात येईल असं सांगितलंय. तसेच पावसाळ्यापूर्वी हा प्रकल्प पूर्ण केला जाईलचं असंही त्यांनी आश्वासन दिलं आहे.

नद्यांच्या स्वच्छतेचा प्रकल्प राबवताना राडारोड्यामुळे नदीची वहनक्षमता कमी होते. त्यातूनच पावसाळ्यात पूर येऊन सगळीच वाताहत होते. याची काळजी घेण्याबरोबरच राजकीय दबाव झुगारून नदीपात्रातली अतिक्रमणं हटवली. तरच नद्या मोकळा श्वास घेऊ शकतील. नाहीतर कोट्यवधींचा खर्च पाण्यातच जाईल.

close