हापूसच्या देशात आला अमेरिकेचा आंबा !

May 29, 2011 12:34 PM0 commentsViews: 10

विनय म्हात्रे, नवी मुंबई

29 मे

कोकणातील हापूस निघाला अमेरिकेच्या वारीला ही बातमी तशी नेहमीचीच.. आपल्या अस्सल कोकणी हापूसने अमेरिकन नागरिकांना भुरळ पाडल्याचा आपल्याला अभिमानही वाटतो. पण आता अमेरिकेतला आंबा भारतीयांना भुरळ पाडण्यासाठी सज्ज झाला आहे.

टॉमी अटकिन्स, केंट , लिली, किट तामर,आणि ऑस्टीन ही नाव आंब्याची आहेत असं सांगितलं तर कदाचित विश्वास बसणार नाही. परंतु या अमेरिकन आंब्यांच्या जाती आहेत.

अमेरिकेच्या फ्लोरिडा कृषिविद्यापीठाने आंब्यावर संशोधन करुन या सात जातीची कलमं तयार केली. हीच कलमं रत्नागिरीचे आंबा बागायतदार शशीकांत पटवर्धन यांनी आपल्या बागेत लावली आहे. त्या झाडांचेच आंबे एपीएमसी बाजारपेठेत आलेत.

कोकणातल्या हापूस आंब्याची गोडी या आंब्याला नसली तरी फाईव्ह स्टार हॉटेलमधून मात्र या आंब्याला मागणी असल्याच व्यापार्‍यांचं म्हणणं आहे. अमेरिकेच्या लोकांनी हापूसची चव चाखली ती त्यांना आवडलीही. परंतु आता त्यांनी त्यांच्या आंब्याची एक वेगळी चव देऊन हापूसची परतफेड केलीय हे नक्की.

close