मोस्ट वाँटेड यादीवर पाकने मागितले स्पष्टीकरण

May 29, 2011 12:40 PM0 commentsViews: 7

29 मे

भारताच्या मोस्ट वाँटेड गुन्हेगारांच्या यादीबद्दच्या गोंधळाचा फायदा घेत, पाकिस्तानने आता स्पष्टीकरण मागितले आहे. ज्या 50 मोस्ट वाँटेड गुन्हेगारांची यादी भारतानं मागितली त्याबाबतीत पाक अतिशय गंभीर आहे.

पण त्यातल्या गोंधळाबद्दल काय अस पाकनं विचारलं आहे. अर्थात भारत त्यांच्या यादीत त्यांना हवी ती नावं घालू शकतो असंही पाकनं म्हटलं आहे.

त्यामुळेच याबाबतीत संपूर्ण स्पष्टीकरणाची मागणी केल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या तेहमिना जानजुआ यांनी म्हटलंय. या यादीत मुंबईवर हल्ला करण्यात सहभागी असलेल्या पाकच्या 5 लष्करी अधिकार्‍यांचाही समावेश आहे..

close