सुवेज हक यांच्या बदली विरोधात जनआंदोलन

May 29, 2011 1:15 PM0 commentsViews: 6

गोपाल मोटघरे, गोंदिया

29 मे

गोंदियाचे एस पी सुवेज हक यांची बदली रद्द करणाच्या मागणीसाठी जिल्हात जनआंदोलन सुरु झालंय. अल्प कार्यकाळातच हक यांनी जिल्हात काळ्या धंद्याना पायबंद घातला. त्यामुळेच विविध संघटना, सामान्य माणूस त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहे.

रेखा भोगाडे म्हणतात, सुवेज हक गोंदियात शिस्त लावायचं काम करत होते. त्यांची बदली रद्द करावी अन्यथा आम्ही उपोषणाला बसणार आहोत. तर दीपा कशीवर म्हणतात, हक यांनी बर्‍याच अवैध धंदे बंद पाडली त्यामुळे त्यांची बदली होऊ नये शहरासाठी त्यांची गरज आहे.

सामान्य जनतेच्या या भावना आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेज हक यांच्याबद्दल. हक यांची बदली करण्यात आलीय ती रद्द करावी या मागणीसाठी गोंदियातील सर्व नागरिक एकवटले आहेत. त्यासाठी एसएमएस कॅम्पेनही सुरु करण्यात आलं आहे.

सुवेज हक यांनी 6 महिन्यांच्या अल्पशा कार्यकाळात चांगली कामगिरी बजावली. सर्व काळ्या धंद्यांना चाप लावला. त्यामुळेच बजरंग दलालाही हक यांची बदली रद्द करण्यासाठी चक्का जाम आंदोलन करावसं वाटलं. या बदलीमागे अनेकांना राजकारणाचा संशय येतोय. कारण त्यांच्या कामगिरीमुळे अनेकांचे काळे धंदे बंद झाले आहे.

लोकांच्या आंदोलमानुळे हक यांची बदली रद्द होते की नाही हा प्रश्न महत्त्वाचा नाही. पण, सध्या प्रशासकीय अधिकारी केवळ घोटाळे आणि अकार्यक्षमतेसाठी चर्चेत असतांना, सुवेज हक यांच्या सारख्या कर्त्यव्यदक्ष अधिकार्‍यानं केलेली चमकदार कामगिरी निश्चितच आशावादी आहे.हक यांची कामगिरी

- जिल्ह्यातले सर्व जुगार अड्डे बंद केले – रेशन माफिया आणि भेसळखोरांना चाप – बोगस खत कारखान्यांना टाळं – पोलिसांच्या समस्या सोडवण्यासाठी पोलीस हेल्पलाईन सुरू – तोतया नक्षलवाद्यांचं रॅकेट उद्‌ध्वस्त – 7 लाचखोर पोलिसांवर निलंबनाची कारवाई – शहरात मार्शल पथकाची स्थापना

close