सोनवणे प्रकरणी चार्जशीटची जबाबदारी सीबीआयची !

May 29, 2011 1:25 PM0 commentsViews: 2

29 मे

यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणात चार्जशीट दाखल न होणं हे पोलिसांचे यश किंवा अपयश नसल्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी व्यक्त केलं. लोकांच्या मागणीनंतर याचा तपास सीबीआयकडे सोपवल्याची आठवण करून देत त्यांनी याची जबाबदारी सीबीआयकडे ढकलली. रेव्हमॅक्स या कंपनीच्या सीएसआरतर्फे महाराष्ट्र पोलीस अकादमीत उभारण्यात आलेल्या सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रणालीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

close