साहित्यिक चारूता सागर यांचे निधन

May 29, 2011 2:48 PM0 commentsViews: 84

29 मे

ज्येष्ठ साहित्यिक आणि कथाकार दिनकर दत्तात्रय भोसले ऊर्फ चारूता सागर यांचं वृद्धापकाळाने सांगलीतील माळणगाव इथं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. सैन्यात असताना लिहिलेली 'आंघोळ' ही त्यांची पहिली कथा. चारुता सागर यांना ग्रामीण कथाकर म्हणूनही ओळखलं जातं.

नागिण, नदीपार आणि मामाचा वाडा हे त्यांचे गाजलेले कथासंग्रह होय. 'नागिण'साठी 1976-77 मध्ये त्यांना उत्कृष्ट लघुकथा लेखक पुरस्कारही मिळाला होता. त्यांच्या लेखनावर बंगाली लेख शरद बाबू यांचा विशेष प्रभाव होता.

close