अण्णांना मारण्यासाठी मंत्र्याने दिली होती सुपारी !

May 29, 2011 3:36 PM0 commentsViews: 7

29 मे

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्याला मारण्याची सुपारी एका नेत्यानंच दिली होती. असा खळबळजनक गौैप्यस्फोट केला आहे. आपल्याला मारण्यासाठी 30 लाखाची सुपारी दिली होती आणि आपल्यासोबत आणखी एका जणाला मारण्यासाठी 30 लाखाची सुपारी दिली होती.

मात्र मारेकर्‍यांनी दुसर्‍याव्यक्तीस मारण्यास होकार दिला पण मला मारण्यास नकार दिला होता. मारेकर्‍यांनी त्या मंत्र्याला म्हणाले की, अण्णांसारख्या साधू माणसाला मारण्याचं पाप आम्ही करणार नाही असा खुलासा अण्णा हजारे यांनी बंगलोर येथे केला. मात्र ही दुसरी व्यक्ती कोण होती याची त्याव्यक्तीच नाव घेण्यास अण्णांनी टाळलं. अण्णा हजारे यांचा भारत दौरा सुरू आहे त्यानिमित्त ते बंगलोर येथे आले होते.

दरम्यान अण्णांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरील टीकेनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना लक्ष केलं. पंतप्रधान मनमोहन सिग चांगले आहेत. मात्र रिमोट कंट्रोल सोनियांच्या हाती असल्यामुळे त्यांनाही काही पर्याय नाही असं अण्णांनी म्हटलं आहे. या रिमोट कंट्रोलमुळेच प्रश्न निर्माण होतायेत अशी टीका ही अण्णांनी केली.

close