चिपळूणमधील आयआयटीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष धोक्यात

November 11, 2008 1:54 PM0 commentsViews: 33

11 नोव्हेंबर, चिपळूणराकेश शिंदे चिपळूणमधील मंदार एज्युकेशन सोसायटीने सरकारी मान्यता नसतानाही हजारो रुपये फी घेऊन विद्यार्थ्यांना आय.टी आयला प्रवेश दिला आणि आता तीनच महिन्यात संस्था हे कॉलेज बंद करतेय. विद्यार्थ्यांनाही त्यांची फी परत घेऊन जायला सांगण्यात आलंय. त्यामुळे या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्षच वाया जाण्याची शक्यता आहे.चिपळूणच्या मंदार एज्युकेशन संस्थेतल्या या विद्यार्थ्यांनी ऑगस्टमध्ये आय टी आयसाठी अ‍ॅडमिशन घेतलं. आता तीन महिन्यानंतर संस्थेकडून त्यांना या आय टी आय ट्रेड्सना मान्यता नसल्याचं सांगण्यात आलं. शैक्षणिक वर्ष वाया जाणार असल्यानं विद्यार्थी चिंतेत आहेत. ' कॉलेज सुरू होऊन तीन महिने झाले आहेत. दिवाळीची सुट्टी पडली, तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की, आयटीआय बंद होणार आहे. त्यांनी अगोदर असं सांगितलं पण नव्हतं, की हे तात्पुरतं अ‍ॅडमिशन आहे ',असं विद्यार्थी महेश शिंदे सांगत होता. आता कुठेही अ‍ॅडमिशन मिळणार नाही, याची जाणीव विद्यार्थ्यांना आहे. ' हे वर्ष आमचं फुकट जाणार, याची जबाबदारी कोण घेणार ? कारण यामुळे आम्हाला इतर ठिकाणी कोणत्याही क्षेत्रात अ‍ॅडमिशन मिळणार नाही ',असं आयआयटीचा विद्यार्थी संदीप शिंदे सांगत होता.या अन्यायाविरूद्ध दाद मागण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनही केलं. आता या विद्यार्थ्यांकडून घेतलेली फी संस्थेनं परत देण्याचं मान्य केलंय. मात्र आयटीआय ट्रेडसना मान्यता कधी मिळेल, याची खात्री संस्थेला नाही. सरकारी मान्यता नसल्यामुळे या विद्याथ्यांर्ची परीक्षा संस्था घेऊ शकणार नाही. त्यामुळे एक वर्ष वाया जाण्याबरोबरच विद्यार्थ्यांना आर्थिक फटकाही बसणार आहे.

close