हमिदाबाईची कोठी पडद्याआड

May 29, 2011 4:09 PM0 commentsViews: 11

29 मे

सुनील बर्वेच्या हर्बेरियम मधील हमीदाबाईची कोठी या नाटकाचा 25 वा प्रयोग रसिकांच्या उपस्थितीत झाला. या शेवटच्या हाऊसफुल प्रयोगाला नाना पाटेकर, भारती आचरेकर, गिरीजा ओक,सचिन खेडेकर असे अनेक कलावंत आले होते.

यावेळी हर्बेरियमच्या पुढच्या नाटकाचीही घोषणा करण्यात आली. वसंत कानेटकरांचे विषवृक्षाची छाया हे नाटक आता हर्बेरियमच्या उपक्रमांतर्गत निर्मित होईल.

गिरीजा ओक, सचिन खेडेकर या नाटकात आपली भूमिका साकारणार आहेत. गिरीश जोशीचं दिग्दर्शन आहे. यावेळी नानाने आपल्या नेहमीच्या शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. आपल्याला सखाराम बाईंडर पुन्हा करायला आवडेल असंही नाना म्हणाले.

close