ऐतिहासिक रामला तलाव घाणीच्या साम्राज्यात

May 29, 2011 3:45 PM0 commentsViews: 3

29 मे

चंद्रपूरचा ऐतिहासिक रामला तलाव प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घाणीच्या साम्राज्यात सापडला आहे. चंद्रपूरच्या गोदाकालीन इतिहासाची साक्ष असणार्‍या पाच तलावापैकी कानोरी, घुटकाला,लेडी आणि गोरी या चार तलावाचे अस्तित्व संपलं असून त्यामध्ये घरं बांधलेली दिसतात आणि उरलेल्या रामला तलावात 'आठोकोणीया' या वनस्पतीचा हिरवा थर पसरलेला दिसत आहे. यामुळे जिल्हा प्रशासन काय करतंय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

रामला तलावात वाढलेल्या पान वनस्पतीमुळे मासेमार्‍यांना रोजी रोटीपासून मुकावे लागले व या तलावाची शुध्दता हरपली आहे. शहाराला पाणीपुरवठा करणार्‍या तलावात आता घाण पसरली आहे . त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता गंभीर होत आहे.

एकूण 85.3 एकर परिसरात पसरलेल्या या रामाला तलावातील आठोकोणीया या वनस्पती सगळीकडे पसरली आहे. वर्धा, ईरा या नद्यापर्यत ही वनस्पती पसरली आहे.

जिल्हा प्रशासनाने 3 वर्ष अगोदर हा तलाव साफ केला होता. परंतूयाकडे आतार्यत गंभीरपणे दुर्लक्ष केलंय. परंतू चंद्रपूर शताब्दी वर्ष साजरं करीत आहे. विकासकामासाठी 250 निधी मिळणार असल्याचे समजते ,मात्र डेंगू , मलेरिया हे रोग रोखण्यासाठी चंद्रपूर प्रशासन किती मोलाची भुमिका घेत आहे याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

close