युती सोबत 10 वर्ष काढणार !

May 29, 2011 4:21 PM0 commentsViews: 5

29 मे

काँग्रेस-राष्ट्रवादीनं सत्तेत वाटा दिला नाही त्यामुळेच त्यांचा काटा काढण्यासाठी भाजप सेनेशी युती केल्याचे स्पष्टीकरण आज रामदास आठवले यांनी दिलंय. 20 वर्षे आघाडीत राहिलो आता दहा वर्षे सेना- भाजप सोबत काढणार असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसने कबूल केलेला सत्तेचा वाटा दिला नाही त्यामुळेच आपण युतीकडे गेलो असल्याची खंत आठवले यांनी बोलून दाखवली. राजकारणात काही होऊ शकते त्यामुळे युतीसोबत दहा वर्ष अनुभव घेणार आहोत असं ही रामदास आठवले यांनी सांगितलं.

close