लहान मुलांनी आयपीएलपासून दूर राहा – रत्नाकर शेट्टी

May 29, 2011 3:51 PM0 commentsViews: 7

29 मे

आंतरराष्ट्रीय क्रिकेट महत्त्वाचं की आयपीएल असा वाद मागचा आठवडाभर क्रिकेट वर्तुळात रंगला होता. आयपीएलमुळेच हा वाद सुरु झाला. त्यामुळे ही स्पर्धा सुरु करणार्‍या बीसीसीआयकडून या विषयावर आतापर्यंत कोणी बोललं नव्हतं. बोर्डाचे सीएओ रत्नाकर शेट्टी एका क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने या विषयावर पहिल्यांदा बोलले. पण त्यांनी चक्क आयपीएलच्या विरोधात विधान केलंय. लहान मुलांना त्यांनी सल्ला दिला तो आयपीएलपासून दूर राहण्याचा.

close