मुंबईत मान्सून 10 जूनला

May 30, 2011 9:10 AM0 commentsViews: 57

30 मे

देशात मान्सूनच्या पहिल्या सरीचं आगमन केरळमध्ये झालं आहे. हवामान खात्याने जाहिर केलेल्या अदांजापेक्षा दोन दिवस अगोदरच पावसानं केरळला धडक दिली आहे. पहिल्याच दिवशी पावसाने केरळ आणि तामिळनाडूच्या बहुतांश भागात दमदार हजेरी लावली.

उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना मात्र पहिल्या सरीसाठी 10 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. हवामान खात्याने 10 जूनला मुंबईत पावसाचे आगमन होईल असा अदांज व्यक्त केला आहे. यंदा मान्सून चांगला असून पुढील चार महिन्यांच्या पावसाळ्यात सरासरी 98 टक्के पाउस पडणार असल्याचा अंदाज आहे.

close