मुख्यमंत्र्यांना वाटतो गुजरातच्या प्रगतीचा हेवा !

May 30, 2011 9:31 AM0 commentsViews: 1

30 मे

गुजरातच्या विकासाचा हेवा खुद्द महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही सुटला नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुजरातच्या कृषीक्षेत्रातल्या आघाडीचं कौतुक केलं आणि सोबतच महाराष्ट्राच्या कृषी, सिंचन आणि जलसंधारण खात्यावर टिका केली.

विशेष म्हणजे कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात त्यांच्याच अध्यक्षतेखाली होणार्‍या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही नाराजी व्यक्त केली. सोबतच सिंचन आणि जलसंधारण सांभाळणार्‍या राष्ट्रवादीवरही नाव न घेता टीका केली. राहुरी कृषी विद्यापीठाच्या 39 व्या कृषी संशोधन आणि विकास परिषदेत ते बोलत होते.

close