ताडोबा प्रकल्प पावसाळ्यात बंद राहण्याची शक्यता

May 30, 2011 10:22 AM0 commentsViews: 65

30 मे

चंद्रपुरातला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प या पावसाळ्यात पर्यटकांसाठी बंद राहण्याची शक्यता आहे. देशातील 16 राज्यात असलेल्या व्याघ्र प्रकल्पातून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पावसाळ्यातही सुरु राहते.

मात्र हा काळ वन्यजीवांचा प्रजननाचा काळ असतो. त्यांना एकांत मिळावा, पर्यटकांकडून त्रास दिला जाऊ नये तसेच जैव विविधतेवर पडणारे दुष्परिणाम लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

तसा प्रस्तावही ताडोबा वन विभागाने प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाला परवानगीसाठी पाठवला आहे. ही परवानगी मिळाल्यास ताडोबा 15 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत पर्यटकासांठी बंद राहील.

close