रिलायन्स कंपनीविरोधात शेतकर्‍यांचं बेमुदत सत्याग्रह

May 30, 2011 10:31 AM0 commentsViews: 2

30 मे

पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमधून रिलायन्स गॅस कंपनीची गॅस पाईपलाईन गेली. ही पाईपलाईन अनेक शेतकर्‍यांच्या शेतजमिनीतून गेली. मात्र बाजारभावाप्रमाणे योग्य मोबदला दिला नाही. तसेच अनेक शेतकर्‍यांचे पैसे दलालांनी लुटले असा आरोप करत पुण्यात शेतकर्‍यांनी बेमुदत सत्याग्रह सुरू केला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या सत्याग्रहाला आज सुरूवात झाली. रिलायन्स तसेच जिल्हाधिकारी आणि महसूल विभागाशी वारंवार संपर्क साधूनही ते दाद देत नाहीत असा या शेतकर्‍यांचा आरोप आहे. त्यामुळे या शेतकर्‍यांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी करत युवक क्रांती दल आणि शेतकर्‍यांनी हे आंदोलन केलंय.

close