लोकमान्य नगरच्या नागरिकांचे 8 दिवसांपासून उपोषण सुरुच

May 30, 2011 10:40 AM0 commentsViews: 3

30 मे

मुंबईतील दादर येथील लोकमान्य नगर मधील नागरिकांनी गेल्या आठ दिवसांपासून आमरण उपोषण सुरु केलंय. यामध्ये काही जेष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. म्हाडा आणि बिल्डर लोकमान्य नगरमध्ये काही ठराविक लोकांना हाताशी धरुन मनमानी पध्दतीने पुर्नविकासाचा प्रकल्प राबवत असल्याचा आरोपही उपोषण कर्त्यांनी केला.

या प्रकल्पाला सत्तर टक्के लोकांचे सहमती पत्र नसता नाही म्हाडाने बिल्डरला एन ओ सी कशाच्या आधारावर दिला असा सवाल स्थानिक रहिवाशी करत आहेत.

त्यामुळे करारनाम्यात बँक गॅरंटी तसेच बांधकामाची गॅरंटी देण्याचा आणि रहिवाशांना अंधारात ठेऊन या ठिकाणी राबवल्या जाणार्‍या प्रकल्पाला न्यायालयीन चौकशी व्हावी आणि सर्वसामांन्याना त्यांच्या हक्काचं घर मिळावे या साठी गेल्या सात दिवसापासून येथील रहिवाश्यांनी उपोषण सुरु केलंय. परंतु कोणत्याही शासकीय अधिकार्‍यांनी याची अजुनही दखल घेतलेली दिसत नाही.

close