कंटेनरला आग लागल्यामुळे 58 वाहनं जळून खाक

May 30, 2011 10:51 AM0 commentsViews: 2

30 मे

नागपूरच्या आर्या कार शोरुमच्या उभ्या असलेल्या कंटेनरला अचानक लाग लागली. कंटेनरमध्ये नव्याकोर्‍या कार होत्या. या आगीत 18 कार जळून खाक झाल्या तर ही आग कंटेनरच्या आसपास ही पसरली यामुळे 40 मोटरसायकल जळून खाक झाल्या आहे. सकाळी 9.30 च्या दरम्यान ही आग लागली. फायर ब्रिगेडने ही आग विझवली. यात आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण यात कोट्यवधीचं नुकसान झालं आहे.

close