सेंट्रल किचन पद्धत रद्द करावी मागणीसाठी धरणं आंदोलन

May 30, 2011 1:03 PM0 commentsViews: 5

30 मे

राज्यसरकारतर्फे शालेय पोषण आहार योजनेसाठी सेंट्रल किचन पद्धतीसाठी नव्याने निविदा मागवल्या गेल्या आहेत. या निविदांमधल्या अटी छोटे बचतगट पूर्ण करू शकत नाहीत त्यामुळे ही सेंट्रल किचन पद्धत रद्द करावी अशी मागणी पुण्यामध्ये करण्यात आली.

यावेळ अनेक बचत गटांनी एकत्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. सध्या शालेय पोषण आहारासाठी बचत गटाच्या महिलांमार्फत अन्न शिजवलं जातं. मात्र ही पद्धत बदलत दर 25 हजार विद्यार्थ्यांमागे एक सेंट्रल किचन तयार करण्याची सरकारची योजना आहे.

यासाठी 10 लाख रुपयांचे डिपॉझिट तसेच धान्य साठवण्यासाठी जागा अशा अटींची पुर्तता करणे आवश्यक आहे. याच अटी या बचत गटांसाठी जाचक ठरत आहे.

close