महाराष्ट्राची मान शरमेनं खाली गेली – साहित्यिक गो.मा. पवार

November 11, 2008 2:08 PM0 commentsViews: 5

11 नोव्हेंबर, सोलापूर ज्येष्ठ साहित्यिक गो.मा. पवार यांनी राज ठाकरे यांच्या आंदोलनाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. परप्रांतियांविरोधातल्या आंदोलनामुळे महाराष्ट्राची मान शरमेनं खाली गेल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.' महाराष्ट्रात प्रांतीय अभिमानाची लाट आली आहे. त्याचे परिणाम दिसून येत आहे. कोणाही सच्च्या महाराष्ट्रीय माणसावर लज्जेनं मान खाली घालण्याची वेळ आली आहे. प्रांतीयवादामुळे महाराष्ट्राची शान कमी झाली आहे. पूर्वी माणसं महाराष्ट्राचे आहोत, असं अभिमानानं सांगायचे पण आता महाराष्ट्राचे असल्याचं सांगताना मान शरमेनं खाली जाते ',असं गो.मा.पवार यांनी सांगितलं.

close