राष्ट्रवादीने उचलला नामांतराचा प्रश्न !

May 30, 2011 4:38 PM0 commentsViews: 3

30 मे

रामदास आठवले शिवसेनेसोबत युती करणार हे स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेस आघाडीत आता डॅमेज कंट्रोल मोहिम सुरू झाली. आठवले काँग्रेस आघाडीबरोबर आणि विशेषत: राष्ट्रवादीबरोबर अधिक काळ राहिल्याने आता राष्ट्रवादीला अधिक काळजी घेणं भाग आहे.

त्यातूनच मुंबईतील दादर स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेशन किंवा चैत्यभूमी स्टेशन असं नावं द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी करणार आहे. राष्ट्रवादीचा येत्या 10 जूनला मुंबईत मोठा मेळावा भरतोय यामध्ये ही मागणी राष्ट्रवादी करणार आहे. दरम्यान बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांना खूश करण्यासाठी राष्ट्रवादी ही मागणी करतेय असा आरोपही होतोय.

close