म्हाडाच्या लॉटरीला सुरूवात ; पहिला विजेता पंकज चरणसिंग

May 31, 2011 5:57 AM0 commentsViews: 7

31 मे

म्हाडाच्या घरांची सोडत आज बांद्रा येथील रंगशारदा हॉलमध्ये सुरू झाली आहे. तब्बल 4,034 घरांची विक्री आज होणार आहे. सकाळी 10 वाजता या सोडतीला सुरूवात झाली आहे. या लॉटरीचा पहिला विजेता ठरलाय पंकज चरणसिंग. पंकजला पवईतल्या उच्च उत्पन्न गटातील घर मिळालं आहे. यावर्षी म्हाडानं मुंबईत सर्वसामान्य नागरीकांना स्वस्त दरात, 4034 घरं विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत.

या घरांसाठी म्हाडानं ऑनलाईन अर्ज मागवले होते. म्हाडाकडे एक लाख तीस हजार दोनशे तेहत्तीस अर्ज डिपॉझीटसह जमा झाले आहेत.मुंबईत घर घेण्याचं स्वप्न चार हजार 34 लोकांचे स्वप्न आज पूर्ण होणार आहे. यासाठी म्हाडाने प्रतिक्षानगर,मालवणी,मागठाणे,कुर्ला, पवई, सिंपोली,मानखुर्द आणि शैलेंद्रनगर या भागाचा समावेश केला आहे.

close