पुण्यात भाजपमध्ये वाद शिगेला; गोगावलेंना नोटीस

May 30, 2011 4:48 PM0 commentsViews: 4

30 मे

पुणे भाजप शहर अध्यक्षपदावरून सुरू असलेला गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्यामधील वाद शिगेला पोचला आहे. मुंडे गटाच्या योगेश गोगावले यांना शिस्तपालन समितीने नोटीस बजावली आहे.

भाजपच्या शहरअध्यक्षपदी गडकरी गटाचे विकास मठकरी यांची नियुक्ती करण्यात आल्याने मुंडे गट नाराज आहे. मुंडे समर्थक गटाच्या योगेश गोगावले यांनी मात्र ही पत्रकार परिषद घेत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.

त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आलीय. गोपीनाथ मुंडे यांनी शनिवारी पुण्यात झालेल्या शिवशक्ती भिमशक्ती मेळाव्याकडे पाठ फिरवली होती.

close