शाहिद आफ्रिदीची आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

May 31, 2011 6:41 AM0 commentsViews: 1

31 मे

पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कॅप्टन शाहिद आफ्रिदीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड ज्या पद्धतीने आपल्यासोबत वागत आहेत. त्याचा आता आपल्याला कंटाळा आला आहे आणि म्हणूनच आपण निवृत्तीचा निर्णय घेतल्याचं आफ्रिदीने सांगितले आहे.

पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड कधीही खेळाडूंसोबत आदराने वागत नाही. त्यामुळेच आता आपण निवृत्त होत असल्याचे आफ्रिदीने सांगितले आहे. आफ्रिदीच्या नेतृत्वाखालीच पाकिस्तानी क्रिकेट टीम यंदाचा वर्ल्ड कप खेळली होती. जर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे सदस्य बदलले तर आपण परत येण्याचा विचार करू असंही आफ्रिदीनं स्पष्ट केलं आहे. आफ्रिदीने यापूर्वीही निवृत्तीचा निर्णय घेतलेला आहे.

close