कल्पेश क्रिकेट स्पर्धेत माटुंगा सेंटरची बाजी

May 30, 2011 4:52 PM0 commentsViews: 4

30 मे

मंुबईतील प्रतिष्ठेच्या कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेत यंदा माटूंगा सेंटरनं बाजी मारली. मुंबईतील 16 टीम या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. फायनलमध्ये कांदिवली सेंटर आणि माटुंगा सेंटर या टीम आमने सामने आल्या. यात माटुंगा सेंटरने बाजी मारली आहे. विजेत्या टीमला माजी रणजीपटू विजय भोसले यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सीरिज माटुंगा टीमचा ओमप्रकाश जयस्वाल ठरला. स्पर्धेचं यंदाचं हे 21 वं वर्ष आहे.

close