नवलेंचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड

May 30, 2011 4:57 PM0 commentsViews: 6

30 मे

पवन गांधी चॅरीटेबल ट्रस्ट फसवणूक प्रकरणी सिंहगड संस्थेचे संस्थापक मारूती नवले यांनी पौड पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या जबाबामुळे नवले अडचणीत येणार आहेत कारण जबाबात नवले यांनी 2008 साली पवन गांधी ट्रस्टच्या चैनसुख गांधींसोबत कराराची मुदत वाढवण्यात आल्याच म्हटलंय.

तर दुसरीकडे गांधींना पाठवलेल्या पत्रात 2011 साली करार वाढवल्याचे सांगितले आहे. यामुळे नवलेंचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. नवलेंसी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी आपण दिल्लीत असल्याचे सांगितलंय.

नवलेंनी करारनाम्यात खाडाखोड करून जागा बळकावण्याच्या इराद्यानं फसवणूक केल्याप्रकरणी ट्रस्टनं पौड पोलीस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणी तक्रार डेक्कन पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलीय पण अद्यापी नवलेंवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. सातत्यानं नवले खोटं बोलत असल्याचे निदर्शनास आणून ट्रस्टींनी नवलेंवर कारवाईची मागणी केली.

close