मेधा पाटकर यांच्या विरोधात आंदोलन

May 31, 2011 7:15 AM0 commentsViews:

31 मे

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या मागण्या राज्यसरकारने मान्य केल्या. पण गरीबांना मात्र बेघर केलं.त्यामुळे आम्हाला हक्काच्या घरांपासून वंचित राहावं लागणार आहे असं सांगत गोळीबार रोडवरच्या जवाहर नगर रहिवासी एकता मंचाच्या वतीनं सोमवारी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात येथील 2000 रहिवासी सहभागी झाले होते. मेधा पाटकर यांच्याविरोधात या रहिवाशांनी घोषणाही दिल्या. गोळीबार रोडवरच्या गणेशकृपा सोसायटीतल्या रहिवाशांसाठी मेधा पाटकरांनी उपोषण केलं होतं. एसआरए बद्दलची मागणी राज्य सरकारने मान्य केली .त्यामुळे आमच्या घरांचा पुनर्विकास रखडला असा आरोप या रहिवाशांनी केला.

close