शेतकर्‍यांनी केली भूसंपदान अधिकार्‍यांना बेदम मारहाण

May 30, 2011 5:08 PM0 commentsViews: 6

30 मे

औद्योगिक वसाहतीसाठी जमीन संपादन करण्याच्या विरोधात सांगली जिल्ह्यातील वाघवाडी इथं शेतकर्‍यांनी आंदोलन केलं. एकीकडे जमिनीची मोजणी आणि त्याच वेळी आंदोलकांची धरपकड यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी दोन भूसंपदान अधिकार्‍यांना बेदम मारहाण केली. आणि मोजणीचं काम बंद पाडलं.

पुणे बेंगलोर हायवेजवळ बाघबाडी जांभूळवाडी परिसरात सरकारने नवी एम.आय.डी.सी. मंजूर केली. त्यासाठी पिकाऊ जमीन संपादित करु नये अशी मागणी या भागातील शेतकरी करत आहेत.

तरीही जमीन मोजणीचं काम पोलिसांच्या मदतीनं सुरु करण्यात आलंय. त्या विरोधात शेतकर्‍यांनी निदर्शन केली. खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेसचे रणधीर नाईक यांनी शेतकर्‍यांचे नेतृत्व केलं. जवळपास शंभर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने जमाव खवळला. सध्या या गावात तणाव असून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

close