ई-गव्हर्नन्सतर्गंत मतदारांना युआयडी कार्ड देणार

November 11, 2008 2:10 PM0 commentsViews: 9

11 नोव्हेंबर, दिल्लीई- गव्हर्नन्स म्हणजे ऑनलाईन सरकारी सुविधांची प्रक्रिया अधिक सोपी व्हावी यासाठी सरकार आता मतदारांना युनिक आयडेंटिफिकेशन कार्ड देणार आहे. या कार्डावर प्रत्येक मतदाराचा एक क्रमांक असेल आणि हे कार्ड रेशन कार्ड, पॅन कार्ड, मतदानपत्रासारख्या ओळखपत्रांऐवजी वापरता येईल. बँकेत विविध प्रकारची परवाने घेताना टॅक्स रिटर्न्स भरताना हे युआयडी कार्ड दाखवता येईल. या कार्डामुळे सरकारकडे कर बुडवणार्‍या प्रत्येक नागरिकाची नोंद राहील. भविष्यात 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांनाही युआयडी कार्डस देण्यात येतील.

close