पेट्रोलचे दर आणखी वाढणार !

May 31, 2011 7:56 AM0 commentsViews: 5

31 मे

सर्वसामान्यांवर पुन्हा एकदा दरवाढीची कुर्‍हाड कोसळण्याची शक्यता आहे. इंडियन ऑईलने पुढच्या आठवड्यात पेट्रोलचे दर वाढवण्याचे संकेत दिले आहेत. यापूर्वी 15 मे रोजी पाच रुपयांनी पेट्रोल महागलं होतं. मात्र कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या किंमती पाहता ही भाववाढ पुरेशी नसल्याचं इंडियन ऑईलचं म्हणणं आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात पुन्हा दीड रूपयांनी पेट्रोलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

close