नामांतराच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा राष्ट्रवादीला शह !

May 30, 2011 5:49 PM0 commentsViews: 3

30 मे

दादर स्टेशनला चैत्यभूमी नाव देण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं राष्ट्रवादीला शह दिला. चैत्यभूमी स्टेशनच्या नामांतराची मागणी काँग्रेसचीच आहे त्याला सगळीकडून पाठिंबा मिळतोय ही चांगली बाब आहे असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी राष्ट्रवादीला लगावला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने काँग्रेसच्या वतीनं वर्षभर सामाजिक समता वर्ष साजरं केलं जातंय. त्यासाठी प्रदेश काँग्रेसने खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक समता समिती स्थापन केली.

या समितीने राज्य सरकारला 60 शिफारशी केल्या आहेत. या समितीच्या शिफारशींची अमंलबजावणी राज्य सरकारने तातडीने करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसने केली आहे.

पण काँग्रेसचे शिवशक्ती-भिमशक्तीच्या घोषणेनं धाबे दणाणले आहेत. त्यामुळंच काँग्रेसनं या मागण्यांच्या अनुषंगाने आपला सामाजिक समता अजेंडा जाहीर केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

close