बाळासाहेबांनी आत्तापर्यंत काय काम केले ? – अजित पवार

May 31, 2011 11:20 AM0 commentsViews: 6

31 मे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यात एकही काम केलं नाही अशी टीका अजित पवारांनी केली. मुंबईत बसून फक्त शिवाजी महाराजांच्या नावावर त्यांनी फक्त राजकारण केलं.

अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले इथं अजित पवार बोलत होते. या कार्यक्रमात अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांनाही अप्रत्यक्ष टार्गेट केलं. राज्यकर्त्यांनी सहकार्‍यांवर टीकाटिप्पणी करुन त्यांची उणीदुणी काढून राज्याची उन्नती साधता येत नाही असा टोलाही उपमुख्यमंत्र्यांनी हाणला.

close